प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं' असं पाडगावकरांनी म्हणलं जरी असलं तरी प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं. प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट ही थोडीशी का होईना वेगळी असते. आपल्या स्वतःतचं खूप खास असते. आणि प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळतं असंही नाही. अशीच एक गोष्ट; एका प्रेमाची गोष्ट. तशी ती फार काही सुंदर, देखणी वगैरे नव्हती. आपली चारचौघींसारखीच. पण डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा. एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि ह्या मोठ्या college मध्ये आलेली. नवीन वातावरण, नवीन मित्र-मैत्रिणी ह्यात रमली. College च एक वर्ष भर-भर कसं निघून गेल कळलच नाही. आणि दुसऱ्या वर्षी च admission घ्यायला जाताना तिने त्याला पाहिलं. College च्या त्या हिरवळीवर जिथे मुलं उगाच उनाडक्या करत होती तिथे तो मात्र Psychology च्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला. भवतालच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्याच जगात हरवलेला. Admission करून नंतर ती आपल्या विभागात निघून गेली आणि नंतर दिवसभरात त्याला विसरूनपण गेली. असाचं अधेमध्ये तो दिसायचा; कधी पुस्तकात, कधी मित्रांच्या घोळक्यात, कधी मैत्रिणींच्या गराड्यात. पण तिने कधी इतकं लक्ष नाही दिल. आणि होता-होता gathering चे दिवस आले. Anchoring चे auditions द्यायला ती गेली; आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तो दिसला. त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं, हृदयात धडधडल. Stage वर, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बिनधास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली. पण सगळं अवसान एकवटून, त्याच्याकडे शक्यतो न पाहता तिने Audition दिलं आणि निघून आली. निवड झालेल्या लोकांना Sms द्वारे कळवणार होते. निकाल काहीही असला तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्या तिला मनातून मात्र वाटत होतं की, तिची निवड व्हावी. आणि 2 दिवसांनी Sms आला, तिची निवड झाली होती. मनातून आनंदून गेली ती. पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होता हे तिला कळून आल होत. निवड झालेल्या लोकांना पुढे 15 दिवस थोडंस प्रशिक्षण देणार होते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस College च्या common hall मध्ये बोलावलं होतं. तिथे गेल्यावर तिला कळलं की, त्यांना शिकवणारा प्रशिक्षक तोच होता. तिला अगदी आकाश ठेंगण झालं त्याला बघून. तो मात्र तसाच होता. शांत, हसला तरी त्यातही गंभीरता असणारा. हळूहळू त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. आता ती अधीरतेने lectures संपून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली. किंबहुना ती college ला त्याच्यासाठीच जायला लागली. त्याचं शिकवण, त्याने सांगितलेले सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली. त्याच्याकडे निरखून बघताना तिला लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खळी पडते. त्या खळीत तिचा जीव गुंतला. पण; अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती ;किंवा ते दोघ एकमेकांना पूर्ण ओळखतात असंही नव्हतं. ती त्याच्यासाठी एक विद्यार्थिनीच होती. तिच्यासाठी मात्र तो आता फक्त एक शिक्षक, किंवा college मध्ये शिकणारा एक मुलगा राहिला नव्हता. त्याहून जास्त काहीतरी झाला होता. एक दिवस 1 lecture होणार नव्हतं, त्यामुळे ती नेहमीच्या वेळेपेक्षा आधी Common hall मध्ये गेली. कुणीही आलेलं नसणार ह्याची तिला खात्री होती. पण; तिने पाहिलं की त्या common hall मध्ये तो आलेला होता. आणि कुठल्याशा पुस्तकात हरवून गेलेला. नेहमीसारखाच. पावलं न वाजवता ती त्याच्या जवळ गेली. पण; तिच्या जाण्याने त्याची ती आत्मानंद मूर्ती भंग झालीच. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिचा जीव आभाळाएवढा झाला. मग जुजबी बोलणं सुरू झालं. तोदेखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता पण वाचनाची आवड होती. मराठी साहित्यावर प्रेम होतं. ती स्वतः सुद्धा विज्ञानशाखेची विद्यार्थिनी होती पण साहित्यावर तिचं ही खूप प्रेम होतं. आणि इथे आल्यापासून असा वाचनाची, साहित्याची आवड असणारा कुणीतरी पहिल्यांदाच तिला भेटला होता. त्यामुळे त्यांच्या त्या भेटीने आणि आवडीने त्यांचे मैत्रीचे दरवाजे उघडले. कालांतराने एकमेकांचे mobile number दिले आणि घेतले गेले. पुस्तकं, लेखकांवरून सुरू झालेली ही मैत्री पुढे एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात ही आली. सुख-दुःख, वाटले जाऊ लागले. त्याचं आयुष्य ऐकताना कित्येकदा तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवल होत. आणि ह्या सगळ्या-सगळ्या मधून तीच त्याच्यावरच प्रेम वाढतच चालल होत. पण; ती त्याला ही गोष्ट कधी सांगूच शकली नाही. कारण; त्याच्या आयुष्यातल प्रेम त्याने केलं होतं जे दैवाने त्याच्यापासून हिरावून घेतलं. आणि तो त्या प्रेमाशी एकनिष्ठ होता. हे सगळं ऐकून आपलं प्रेम तिने आतल्या आत दडवलं, त्याला पुसटशी सुद्धा जाणीव होऊ नये म्हणून हसण्याचा आव आणत अश्रू लपवून त्याला भेटत राहिली. College ची 3 वर्ष बघता-बघता संपली. त्यांची मैत्री नाही, पण बोलणं कमी झालं. आपापल्या आयुष्यात दोघेही गुंतले. क्वचित कधीतरी 6-8 महिन्यांनी बोलणं व्हायचं पण ते बोलण सुद्धा तिला खूप काही देऊन जायचं. आणि अचानक 2 वर्षांनी तो तिला तिच्या शहरात भेटला. ध्यानीमनी नसताना तो भेटला ह्याचा आनंद ती लपवू शकली नाही आणि त्यानेही तो आनंद टिपला. 'मी परत इथे आलो तर नक्की तुला भेटेल' असं सांगून तो गेला. ते 2-3 तास आणि पुढचे 2-3 दिवस ती एका अनामिक, गुलाबी विश्वात होती. त्याच अस अचानक भेटणं, बोलणं, दिसणं काही म्हणजे काही तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. ह्या 2 वर्षात तो खुप बदलला होता, जास्तच छान दिसायला लागला होता. ती खळी अजून खोल झालीये अस उगीचचं वाटलं तिला आणि आपल्या ह्या वेड्या विचारच हसू आलं. मग भेटी वाढत राहिल्या. तो जेव्हा तिच्या शहरात यायचा, वेळात वेळ काढून तिला भेटायचा. Coffee वरून सुरू झालेल्या भेटी Dinner पर्यंत कशा गेल्या त्यांचं त्यांनाही कळलं नाही. ह्या सगळ्यात तिला जाणवत होतं की तो बदलला आहे. आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला होता, वेळात वेळ काढून तिच्यासोबत वेळ घालवत होता. तिला वेळ द्यायला, भेटायला काम असतील तर ती बाजूला करत होता. तरीही आपल्या मनातली गोष्ट त्याला सांगावी की नाही ह्या संभ्रमात ती आजही होती. ते सांगून आपण आपली ही मैत्री तर गमावून बसणार नाही ना ह्याची चिंता तिला वाटत होती. म्हणून मनातलं प्रेम आपल्या मैत्रीत दाखवून वेळ मारून नेत होती ती. शिवाय त्याच्या मनात नेमकं काय आहे ह्याचा अंदाज तिला येत नव्हता. एकदिवस असाच तो भेटायला आला. पण न सांगता. तिच्या Hostel च्या बाहेर येऊन त्याने call केला तिला की, 'मी आलो आहे, आपल्याला बाहेर जायचं आहे. पटकन आवरून ये. मी वाट बघतो आहे.' तिला विचार करायला देखील वेळ नव्हता. पटकन आवरून ती गेली. दिवसभर फिरून, रात्री जेवण करून दोघे निघाले. ती पौर्णिमेची रात्र होती, आकाशात पूर्ण चंद्र होता. आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सामसूम होती. दोघेही एकमेकांशी एक शब्दही न बोलता त्या भारावलेल्या वातावरणातून चालले होते. अचानक ती शांतता भंग करत तो म्हणाला, 'आकाशात असा पूर्ण चंद्र, ही थंडी, ही शांतता आणि ह्या सगळ्यातून चाललेलो आपण! आयुष्य जगायला अजून काय लागत!' तिने हे ऐकलं आणि चमकून त्याच्याकडे पाहिलं, तो मात्र त्याच्याच तंद्रीत होता. ह्या सगळ्याचा अर्थ लागेपर्यंत तीच Hostel आलं, निरोपाची वेळ आली! आणि न राहवून तिने त्याला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून वाहणार पाणी आज तिने थांबवल नाही. त्याचा शर्टवर तिच्या अश्रुंचे डाग पडू दिले. तिच्या अचानक मिठी मारण्याने तो भांबावला होता पण काही क्षणात लगेचच सावरला, आणि त्याने तिला मिठीत सामावून घेतलं. काही क्षणांचा खेळ! पण त्या क्षणात ती इतके वर्ष त्याच्या सोबत असून, त्याचा जवळ असून ती बोलू शकली नव्हती ते सगळं होत. त्याच्या मिठीत काही निमिष गेले असतील पण तिला ते जन्मांसारखे वाटले. शेवटी मिठी सैल करत तोच तिला म्हणाला, 'खूप उशीर झाला आहे. तुला आता गेलं पाहिजे.' आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत तिच्याकडे पाठ करून तो त्याची वाट चालू लागला. एकदाही मागे वळून न बघता. काय झालं, कसं झालं ह्या विचारांच्या धुंदीत ती खोलीत कधी आली, कशी आली, आणि पलंगावर पडून झोप कधी लागली हे तिचं तिलाही कळलं नाही. सकाळी उठली तेव्हा रात्रीच सार काही आठवून तिच्या अंगावर काटा आला आणि चेहऱ्यावर लाजेची लाली उठली. ती स्वतःच गालात खुदकन हसली, आणि आवरायला लागली. सगळं आवरून तिने त्याला Phone करायला मोबाइल हातात घेतला तर त्याचा msg आलेला. धडधडत्या छातीने तिने msg उघडला आणि वाचायला लागली. वाचताना डोळ्यात कधी पाणी आलं आणि ते गालांवरून शांतपणे कधी ओघळायला लागलं ह्याच भान तिला राहिलं नाही. त्याने लिहिलं होतं: 'Dear, काल रात्रीच्या प्रसंगाने आपल्यातील मैत्रीचं नात गळून पडलं. तुझ्या भावना, तुझं प्रेम मला तू न बोलताही कळलं. हे मला आपण College ला असताना सुद्धा कळतं होत. पण मी जाणूनबुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. माझ्या अस वागण्याला खूप कारणं आहेत, पण मी तुला मोजकी आणि महत्वाची 2 कारण सांगतो. एक म्हणजे, ह्या आयुष्यतल आणि ह्या जन्मांतलं माझं प्रेम करून झालाय ग. मी तुला हे खूप आधी सांगितलं होतच. आठवत असेल तुला. दुर्दैवाने ते पूर्णत्वाला नाही जाऊ शकल, ती मधेच सगळं आणि सगळ्यांना सोडून कायमची निघून गेली. तिची माझ्या आयुष्यातली जागा मी ह्या जन्मात तरी कुणाला देऊ शकेल असं मला नाही वाटत. तुला उगाच खोटी आस लावणं मला नाही पटत. आता दुसर कारण ऐक. लहानपणी आपण खेळण्याच्या दुकानात जायचो. तिथे एखादी छानशी बाहुली काचेच्या कपाटात ठेवलेली असते. आपल्याला ती बाहुली खूप आवडते, घ्यावीशी वाटते. पण नंतर आपल्या लक्षात येत की, ही बाहुली खूप महाग आहे. आणि ह्या बाहुलीला ठेवायला आपल्याकडे अस काचेचं घरीपण नाही. कसं आणि कुठे ठेवणार ह्या बाहुलीला आपण? हे उदाहरण मी ह्यासाठी दिल की, ह्यातली ती बाहुली "तू" आहेस ग. पुढचं मी सांगण्याची गरज आहे असं मला नाही वाटतं. तू तेवढी समजदार आहेस. आणि हो, काल रात्री जे काही झालं त्याबद्दल तू स्वतःला दोष देऊ नकोस. माझाही स्वतःच्या भावनांवर ताबा राहिला नाही. आणि परत असं काही होऊ नये म्हणून मी ठरवलं आहे की, मी आता तुझ्या आयुष्यातून निघून जावं. हे नातं अजून गुंतू नये, म्हणून हेच योग्य आहे. तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर. खूप मोठी हो. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. कदाचित; आपण दोघ एकमेकांसाठी बनलेलो नाही. आणि प्रेम केलं, म्हणजे ते मिळायलाच हवं असही नाही ना गं. काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते! तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम राहिलं ह्याची मला जाणीवही आहे आणि खात्री सुद्धा. पण हे प्रेम तू तुझी शक्ती बनव, प्रेरणा बनव. तुझं ध्येय साध्य कर, स्वप्न पूर्ण कर. मग मी समजेल की तू खरंच खूप प्रेम करतेस माझ्यावर. माझं एवढं ऐकशील ना ग? आणि हो, अजून एक ह्यापुढे मला Contact करण्याचा प्रयत्न करू नकोस, कधीही. माझी कोणतीही आठवण तुझ्या जवळ ठेवू नकोस. मला तुझ्या मनात ठेव फक्त.... आठवण म्हणून. करशील ना एवढं माझ्यासाठी? 'सगळे msgs वाचून तिने ते delete केले, number delete केला आणि मनमोकळं रडून घेतलं. खूप-खूप रडून घेतलं. ह्यावर परत कधीही न रडण्यासाठी. आज ती एक प्रेमळ पत्नी आहे, एक आई आहे, एक प्रथितयश लेखिका आणि एक प्राध्यापक आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने सगळं ऐकलं. स्वतःची सगळी स्वप्न पूर्ण केली. आज तिला नाही माहित तो कसा आहे, कुठे आहे, त्याने लग्न केलं की नाही, नवीन काही वाचल की नाही... काहीही माहीत नाही. आणि ती माहिती काढतही नाही. हे ही ऐकलं त्याच. अधूनमधून काही मित्रमैत्रिणींकडून येत कानावर त्याच्याबद्दल पण ती पूर्ण दुर्लक्ष करते. स्वतःच्या वयात आलेल्या लेकीला 'पहिलं प्रेम' म्हणजे काय हे सांगताना तिला हे सगळं आठवून गेलं. आणि सवयीप्रमाणे तिने पाणी डोळ्यातच आटवल. शेवटी मात्र लेकीला हे सांगायला विसरली नाही की, 'चिमू, अगं काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते!'

No comments:
Post a Comment